उस्मानाबाद आणि खामसवाडी मध्ये हाणामारीचा गुन्हा दाखल 

उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीचे अपहरण 
 
Osmanabad police

उस्मानाबाद  : रिक्षा चालक- रोहीत दिपक गवंडी, रा. उस्मानाबाद हे दि. 25 ऑगस्ट रोजी 18.45 वा. सु. उस्मानाबाद येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावर रिक्षासह थांबले होते. यावेळी पुर्वीच्या वादावरून संदिप बुटे, रा. उस्मानाबाद व महेश राठोड, रा. शिंगोली तांडा या दोघांनी रोहीत गवंडी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या गवंडी यांनी दि. 27 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण  : खामसवाडी, ता. कळंब येथील ऋषीकेश बप्पा जाधव हे दि. 26 ऑगस्ट रोजी 21.00 वा. सु. गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 3995 ही चालवत जात होते. यावेळी ग्रामस्थ- हनुमंत जाधव यांनी त्यांच्या पिकअप वान क्र. एम.एच. 25 पी 4968 ने ऋषीकेश यांचा पाठलाग करुन त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने ऋषीकेश यांच्या मो.सा. ला पाठीगून धडक दिल्याने ते रस्त्याबाजूच्या खड्ड्यात पडून जखमी झाले. अशा मजकुराच्या ऋषीकेश यांनी दि. 27 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण 

उस्मानाबाद  : एक 14 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 27 ऑगस्ट रोजी 14.00 ते 17.00 वा. दरम्यान तीच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
                                                                                               

From around the web