वाशी, अंबी पोलीस ठाण्यात हाणामारीचे गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

वाशी  : सुरेश मारुती चव्हाण, रा. पखरुड, ता. भुम हे दि. 28 ऑगस्ट रोजी 08.00 वा. सु. गावातील भैरोबा मंदीरात दर्शनासाठी जात असतांना नातेवाईक- बाळु चव्हाण, अरुण चव्हाण, अर्जुन चव्हाण, पिंटु चव्हाण अशा चौघांनी शेतजमीनीच्या वादावरुन सुरेश चव्हाण यांना शिवीगाळ करुन कत्तीने, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेश यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : ईनगोंदा, ता. परंडा येथील सुरेश  वसंत जगताप हे दि. 23 ऑगस्ट रोजी 17.00 वा. सु. ईनगोंदा गट क्र. 54 मधील शेत ट्रॅक्टरने मशागत करत होते. यावेळी शेत मशागतीच्या कारणावरुन भाऊ- माणिक वसंत जगताप व कैलास वसंत जगताप यांनी सुरेश यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन सुरेश यांच्या डाब्या बरगडीचे हाड मोडले. अशा मजकुराच्या सुरेश जगताप यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी अपघात 

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील शेषेराव नामदेव भाकरे हे त्यांची पत्नी- रेखा व मुलगी- श्रुती यांसह दि. 27 ऑगस्ट रोजी 20.00 वा. सु. शहरातील गालीबनकर येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 0255 ने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0802 हा निष्काळजीपने, हयगईने चालवून शेषेराव यांच्या मो.सा. ला पाठीमागून धकड दिली. या अपघातात शेषेराव यांच्या उजव्या खुब्याचे तर मुलगी- श्रुती हिच्या उजव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या शेषेराव भाकरे यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : रमेश कालीदास गायकवाड, रा. कुंभेफळ, ता. परंडा यांनी दि. 05 ऑगस्ट रोजी 18.00 वा. सु. कुंभेफळ येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 6035 ही निष्काळजीपने चालवल्याने ती अनियंत्रीत होउन घसरली. यात मो.सा. वर पाठीमागे बसलेले काका मनमथ बोकेफोडे, रा. परंडा हे गंभीर जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अभिजीत यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web