येणेगुर, मुरूम , केकस्तळवाडी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

मुरुम:  नागेश भिमाशंकर भिमाशेटटी  वय 48 रा.येणेगुर हे अंध असुन दिनांक 05.06.2021 रोजी 19.00 वा सु नागोबा मंदिरा समोरील कटटयावर बसले असता गावातीलच 1) शुभम बिराजदार 2) वैभव बिराजदार 3)महादेव हुळमजगे 4)व्यंकट हुळमजगे यांनी संगणमत करुन नागेश भिमाशेटटी यांना शिवीगाळ करुन आंधळया लई माजलास का असे अपमानित  करुन  धक्काबुककी केली.अशा मजकुराच्या नागेश यांनी दिनांक 27.06.2021 रोजी दिलेल्या  प्रथम खबरे वरुन गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम:  मेहताब शेख रा.मुरुम हे दिनांक 26.06.2021 रोजी गावातील डागा हॉस्पीटल समोर उभे होते.या वेळी  जुन्या वादातुन गावकरी -जाकीर बागवान ,नदीम ईमनामदार ,अभिषेक मंडले  यांसह अकरा पुरुषांनी ठार मारण्याच्या उददेशाने मेहताब यांना  लोखंडी गजाने व तलवारीने  मारहाण केल्याने  ते जखमी झाले. अशा मजकुराच्या दिनांक 27.06.2021 रोजीच्या प्रथम खबरे वरुन गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  - सरस्वती गरड रा.केकस्तळवाडी ता.उस्मानाबाद या दिनांक 26.06.2021 रोजी 20.30 वा मुलगा व सुन यांसह आपल्या घरात होत्या.यावेळी गावकरी सखाराम, राजा, संपत या शिंदे कुटुंबीयांसह राजाभाउ कावळे यांनी सरस्वती यांच्या घरात घुसुन ^तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणे होतात.*  असे धमकाउन सरस्वती यांसह त्यांच्या मुलगा व सुनेला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व विटेने मारहाण केली.अशा मजकुराच्या सरस्वती यांनी वैदयकिय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भादसं 452,323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web