तेरखेडा, अंबेहोळ, मांडवा येथे हाणामारी 

 
Osmanabad police

येरमाळा: किशोर बाजीराव टेकाळे, रा. तेरखेडा, ता. वाशी यांच्यातील घरगुती भांडण- तक्रारी मिटवण्यासाठी मस्सा, ता. कळंब येथील अच्युत शंकर वरपे व श्याम अच्युत वरपे या दोघा पिता- पुत्रांनी टेकाळे यांना दि. 03 जून रोजी 12.30 वा. सु. कडकनाथवाडी येथे बोलावून घेतले. यावेळी नमूद पिता- पुत्रांनी टेकाळे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली यात टेकाळे यांच्या नाकाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या किशोर टेकाळे यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  -
कचुर अजमोद्दीन शेख, रा. अंबेहोळ, ता. उस्मानाबाद हे दि. 23 जून रोजी 09.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोरील रस्‍त्यावर थांबले होते. यावेळी शेतजमीन पेरणीच्या कारणावरुन नातेवाईक- मैनुद्दीन उस्मान शेख, बबलु मैनुद्दीन शेख, रहेनाबी मैनुद्दीन शेख या तीघांनी कचुर शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मचुर शेख यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वाशी: दशरथ रणदिवे, रा. मांडवा, ता. वाशी हे दि. 24 जून रोजी 12.00 वा. सु. मांडवा येथील आपल्या शेतात असतांना शेजारचे शेतकरी- अनिल रणदिवे यांसह त्यांची मुले- मधु व मोहन हे तीघे शेतजमीनीच्या कारणावरुन दशरथ यांना शिवीगाळ करत होते. यावेळी दशरथ यांचा मुलगा- रामहरी याने वडीलांस शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता नमूद तीघांनी रामहरी यांना दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रामहरी रणदिवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी चोरी

उस्मानाबाद  -  बालाप्रसाद रामराव मुंढे, रा. वंजारवाडी, जि. लातुर यांनी हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 डी 9335 ही दि. 20 जून रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्‍णालयाच्या आवारात लावली असता 11.00 ते 12.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बालाप्रसाद मुंढे यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत तय्यबअली शैकतअली सय्यद, रा. उस्मानाबाद यांचा ट्रक क्र. एम.एच. 25 यु 5086 हा  उस्मानाबाद शहरातील मोंढ्यातून दि. 22- 23 जून दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सय्यद यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  नळदुर्ग: अरुण नामदेव भोसले, रा. इटकळ, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 14 जून रोजीच्या रात्री तोडून घरातील साड्या, विजार- शर्ट व 24,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या भोसले यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत मुस्ताफा मैनोद्दीन जहागीरदार, रा. भीमनगर, नळदुर्ग यांनी घरासमोर लावलेली हिरो होंडा पॅशन प्रो मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 7319 ही दि. 22- 23 जून दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या मुस्ताफा जहागीरदार यांनी दि. 24 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web