तावरजखेडा, धारुर , सारोळा, लोहटा येथे हाणामारी
ढोकी : तावरजखेडा, ता. उस्मानाबाद येथील सुकुमार श्रीमंत फेरे यांच्या कुटूंबीयांचा नातेवाईक- अश्विनी राजकुमार फेरे यंच्या कुटूंबीयांचा पुर्वीच्या वादावरुन राहत्या गल्लीत दि. 22 जुलै रोजी 13.00 व 20.00 वा. सु. वाद झाला. या वादाचे हानामारीत पर्यावसान होउन नमूद दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबातील स्त्री- पुरुषांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुकुमार फेरे व अश्विनी फेरे या दोघींनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परस्परविरोधी कुटूंबीयांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी : धारुर, ता. उस्मानाबाद येथील बाबासाहेब भिमराव रोकडे यांसह त्यांचे 6 कुटूंबीयांचा भाऊबंद- प्रविण काशिनाथ रोकडे यांसह त्यांचे 3 कुटूंबीयांचा आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन धारुर येथे दि. 26 जुलै रोजी 09.00 वा. सु. वादा झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही रोकडे कुटूंबीयांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाबासाहेब रोकडे व प्रविण रोकडे या दोघांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परस्परविरोधी कुटूंबीयांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी : सारोळा (वा.), ता. वाशी येथील राजेंद्र गोविंदराव चेडे यांची मुले दि. 27 जुलै रोजी 08.00 वा. सु. आपल्या घरबांधकामावर पाणी मारत असतांना शेजारील भाऊबंद- संतोष कल्याण चेडे यांच्या घरावर ते पाणी गेले. या कारणावरुन संतोष चेडे यांसह कल्याण चेणे, सुहास चेडे, हनुमंत चेडे अशा चौघांनी राजेंद्र यांसह त्यांच्या मुलांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजेंद्र चेडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : लोहटा (पु.), ता. कळंब येथील तोहफिक सलीम शेख, जावेद सलीम शेख, सलीम हसल शेख या तीघांनी दोन वर्षापुर्वीचा वाद उकरुन काढून गाव शिवारात दि. 26 जुलै रोजी 16.00 वा. सु. गावकरी- रहिम राजु शेख यांना लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली व रहिम शेख यांच्या मोटारसायकलचे नुकसान केले. अशा मजकुराच्या रहिम शेख यांनी दि. 27 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 427, 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.