बेटजवळगा,कसबे तडवळे येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उमरगा : बेटजवळगा येथील माणीक सहदेव कांबळे व महादेव निव्रत्ती कांबळे या दोन्ही   कुटुंबीयांचा शिवारातील गट क्रमांक 58 मधील शेतात शेत मालकीच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस  शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन लाथा बुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिनांक 29 जुन रोजी दिलेल्या परस्पर विरोधी दोन प्रथम खबरे वरुन भादसं 323, 504, 506, 143 अंतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत.

  ढोकी :  हॉटेल चालक -अनिस कोरबु रा.तडवळे (कसबे) हे दिनांक 27 जुन रोजी 22.00 वा साखर कारखान्या समोरील आपल्या हॉटेलच्या दारात झोपले होते. यावेळी गावकरी -अतुल डुमणे, आकाश डुमणे, दिपक ढवळे, लखन हावळे, पांडुरंग हावळे यांनी अनिस यांस झोपेतुन उठवुन जेवण मागितले असता अनिस यांनी हॉटेल बंद झाले असुन जेवण शिल्लक नसल्याचे सांगितले. यावर चिडुन जाउन  नमुद  पाच व्यक्तींनी अनिस यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की  सुरु केल्याने  त्यांच्या बचावास  भाउ- बादशहा, वाजेद, अमिन हे मदतीस आले असता नमुद लोकांनी अनिस, बादशहा, वाजेद,अमिन या चौघांनाही शिवीगाळ करुन, खुनाची धमकी देउन काठीने, दगडाने मारहाण केली.  या मारहाणीत अमिन यांचे डोके फुटले तर बादशहा यांचा हात मोडुन वाजेद यांच्या नाकाचे हाड मोडले आहे.

अशा मजकुराच्या अनिस कोरबु यांनी दिलेल्या  प्रथम खबरे वरुन भादसं 143, 147, 148, 149, 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसायास करणाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल

शिराढोण:  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन फिरोज अत्तार, शब्बीर अत्तार, जिलानी कुरेशी हे शिराढोण येथे दिनांक 29 जुन रोजी 21.15 वा. गर्दी जमवुन चिकन विक्रीचा व्यवसाय करत  असल्याचे शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले.  यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या तीन प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत तीन  गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

                                                                                  

From around the web