उस्मानाबाद, शिरगापूर, कराळी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  आदित्य राजपाल पाटील, रा. उस्मानाबाद हे दि. 18 जुलै रोजी 12.30 वा. सु. जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद समोरील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात असतांना त्यांच्या मोटारसायकलचा धक्का समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला लागला. यावर त्या समोरील मोटारसायकलवरील शंभु काकडे, बाळा रायबान, दोघे रा. उस्मानाबाद यांसह अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांनी आदित्य पाटील यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आदित्य पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग : शिरगापुर, ता. तुळजापूर येथील मोरे कुटूंबातील कल्याणी, सुक्षमा, भारताबाई, अभिषेक यांच्या गटाचा गल्लीतीलच- गायकवाड कुटूंबातील लतिका, पदमीनी, शांताबाई, धोंडाबाई यांच्या गटाचा घरासमोरील जागेत विटा ठेवण्याच्या कारणावरुन दि. 17 जुलै रोजी 15.30 वा. सु. वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी गटांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कल्याणी मोरे व लतिका गायकवाड यांनी परस्परविरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
उमरगा : कराळी, ता. उमरगा येथील नारायण वडदरे, जानका वडदरे, आर्यन वडदरे, सारयन वडदरे अशा चौघांनी शेतवाटणीच्या पुर्वीच्या वादावरुन दि. 04 जुलै रोजी 16.00 वा. सु. कराळी शेत शिवारात भाऊबंद- तुकाराम दत्तात्रय वडदरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तुकाराम वडदरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web