उस्मानाबाद, शिराढोण,कळंब येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : धनगर गल्ली, उस्मानाबाद येथील सचिन धर्मराज वाघमारे व दशरथ बिटे या दोघांनी दि. 22 ऑगस्ट रोजी 19.00 वा. सु. काळा मारुती चौक, उस्मानाबाद येथे नातेवाईक- बालाजी बापु वाघे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांना पुर्वीच्या वादावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगडाने मारहान करुन वाघे यांना जखमी केले. यावरुन वाघे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : अमोल नरसिंगे, रा. जायफळ, ता. कळंब हे दि. 22 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- ऋषीकेश पाटील यांनी मोटारसायकलवर येउन अमोल यांना पाठीमागून धक्का दिल्याने अमोल यांनी त्याचा जाब विचारला असता ऋषीकेश यांसह गावातील- विशाल पाटील, सुरेश देशमुख, मनमथ गुताडे, योगेश पाटील अशा पाच जणांनी अमोल यांना जातीवाचक शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी टामी, कंबर पट्‌ट्याने मारहान करुन जखमी केले. यावरुन अमोल यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 141, 143, 148 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : पापडेगल्ली, कळंब येथील श्रीमती पल्लवी जोशी या मुलगा- गणेश यांसह दि. 23 ऑगस्ट रोजी 12.30 वा. सु. आपल्या घरात होत्या. यावेळी श्रीमती पल्लवी राहत असलेल्या जागेच्या कारणावरुन नातेवाईक- बाबुलाल शिवबकस जोशी व विजयकुमार जोशी या दोघा पिता- पुत्रांनी पल्लवी यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पल्लवी जोशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web