नांदुरी, नंदगाव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

तामलवाडी: राजेश व मयुरेश रविराज भोकरे, दोघे रा. नांदुरी, ता. तुळजापूर हे दोघे भाऊ दि. 31 मे रोजी 17.30 वा. सु. नांदुरी गट क्र. 107 मधील शेताची मशागत करत होते. यावेळी भाऊबंद- 1)सुरज सुरेश भोकरे 2)स्वस्तिक सुरेश भोकरे 3)सुरेश भोकरे 4)लक्ष्मी भोकरे यांसह गावकरी- ऋषिकेश मुळे अशा पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून मशागत आडवून ट्रॅक्टरची चावी जबरीने काढून घेतली. तसेच शेतजमीन मोजणीच्या कारणावरुन राजेश व मयुरेश या दोघा भावांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या राजेश भोकरे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 326, 327, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: सुभाष चौगुले, रा.नंदगाव  ता. तुळजापूर हे मुलगा- शरणाप्पा यांसह दि. 30 मे रोजी 16.00 वा. सु. नांदगाव गट क्र. 538 मधील शेतात पेरणी करत होते. यावेळी शेतजमीन मालकीच्या कारणावरुन गावकरी- नागेंद्र मारुती गुरव  यांनी नमूद दोघा पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शरणाप्पा चौगुले यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  
अपघात

 वाशी: चालक- यशवंत बाबासाहेब गवळी, रा. पारा. ता. वाशी यांनी दि. 11.05.2021 रोजी 18.30 वा. सु. पारा येथील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 20 एफव्ही 4218 ही निष्काळजीपणे, भरधावर वेगात चालवून गावकरी- रामकिसन बाबुराव भराटे हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिल्याने रामकिसन भराटे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- राजेंद्र बाबुराव भराटे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: रंगराव बब्रुवान जामगे, वय 50 वर्षे, रा. कोराळ, ता. उमरगा हे दि. 30.05.2021 रोजी 17.45 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी गावकरी- फलचंद बब्रुवान जामगे यांनी महिंद्रा मेक्सीको वाहन क्र. एम.एच. 25 आर 5928 ही निष्काळजीपणे चालवून रंगराव जामगे यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन शेंडगे हॉस्पीटल, उमरगा येथे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- विठ्ठल रंगराव जामगे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web