नळदुर्ग, काक्रंबा,केशेगाव,.टाकळी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

नळदुर्ग:  पाणी भरण्याच्या  कारणा वरुन शिवीगाळ का केली असा जाब आदर्श मोहन वाघमोडे, रा.इंदीरा नगर, नळदुर्ग यांनी  गल्लीतील श्रीकांत हरी देवकते यांना विचारला  असता देवकते यांनी  आदर्श वाघमोडे यास शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली व कानास मारुन जखमी केले. आदर्श वाघमोडे यांनी दिले  प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर:  खंडु  भिवा क्षिरसागर, रा. काक्रंबा हे त्यांच्या  शेतात असताना शेतातील बांधावरील झाडे तोडण्याच्या व वहीवाटेच्या  कारणा वरुन 1) पांडुरंग क्षीरसागर, 2) किसन क्षीरसागर, 3) नवनाथ क्षीरसागर यांनी   खंडु यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी  मारहाण करुन ठार मारण्याची असी धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 324, 504, 506, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :  माणीक व्यंकट देशमुख, रा. केशेगाव हे शेत गट क्रमांक 128 मधे जनावराना चारा-पाणी करुन परतत असतांना बालाजी वसंत शिंदे, रा. केशेगाव यांनी रस्ता आडवुन या रस्त्याने यायचे नाही. असे धमकावुन माणीक यांना वेळुच्या काठीने मारहाण केल्याने माणीक यांच्या डाव्या कोपराला जखम झाली. अशा मजकुराच्या माणीक  देशमुख यांनी दिलेल्या  प्रथम खबरे वरुन भादसं  341, 324  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा : संतराम हरीभाउ काळे, रा.टाकळी, ता. परंडा हे हणुमंत बाबर यांच्यासह मोटार सायकलवर गावाकडुन जात असताना 1) सुनिल अंधारे, 2) आश्रु दळवी, दोघे रा.जवळा (नि) दोघांनी आडवुन  पैसे परत करण्याच्या व  रजिस्ट़ी  करुन देण्याच्या वादातुन शिवीगाळ करुन खाली पाडुन दगडाने  छातीवर, पाठीवर, कानामागे मारुन जखमी करुन  ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतराम  काळे यांनी दिले  प्रथम खबरे वरुन भादसं  341, 427, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web