लोहारा, इटकळ, बोरी येथे हाणामारी
लोहारा : संजय सिद्रामप्पा माशाळकर, रा. लोहारा यांच्या लोहारा गट क्र. 180 मधील शेत गोठ्यातील दोन मुऱ्हा म्हशी व एक वगार दि. 11- 12 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय माशाळकर यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : श्रीशैल्य माशाळकर, रा. इटकळ, ता. तुळजापूर यांच्या इटकळ गट क्र. 149 मधील शेतातील दोन म्हशी दि. 12 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या श्रीशेल्य माशाळकर यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : ठेकेदार- दिलीप कुंडलीक नागटिळक, रा. बोरी, ता. उस्मानाबाद यांनी तुळजापूर (खु.) रस्त्यालगतच्या एका बांधकामावर पत्रा शेडमध्ये ठेवलेले बांधकाम साहित्यातील शेडचा पत्रा उचकटून आतील आयताकृती 50 लोखंडी पाट्या, हातोडा, 12 मीमी व 16 मीमी आकाराचे लोखंडी गज इत्यादी 37,500 ₹ किंमतीचे साहित्य दि. 12- 13 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या दिलीप नागटिळक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.