कौडगाव,मुरुम,सिरसाव,तुगांव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : दिनांक 04.07.2021 रोजी दुपारी आणणासाहेब पंढरी जाधव, रा.कौडगाव  हे त्यांचे पत्नीसह शेतात काम करता असतांना  त्यांचे भाउ नामदेव पंढरी जाधव रा.कौडगाव यांनी त्यांचे पत्नीस  तुम्ही लोक नांदवु देत नाही या कारणावरुन  दोघांनाही शिवीगाळ करुन कु-हाडीचे दांडयाने मारहाण केल्याने आण्णासाहेब  यांचा डावा हात फॅक्चर करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आण्णासाहेब यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  325,323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: दिनांक  06.07.2021  रोजी 14.45 वा मलंग खाजासाब उस्तुरीवाले,रा. उडचणे प्लॉट, मुरुम हे काशीनाथ गायकवाड यांचे घराचे बांधकाम करत असतांना नामदेव पंडढरी जाधव,रा.कौडगाव यांनी दारु पिण्यास पैसे का देत नाहीस या कारणा वरुन मलंग यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देवुन लाकुड,लोखंडी सळई डोकीत, मानेवर मारुन जखमी केले. मलंग यांनी दिनांक 06  जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं  324,323, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: प्रशांत शिवाजी घवले, रा. सिरसाव ता.परंडा हे दिनांक  22.06.2021 रोजी 17.30 वा त्यांचे शेतात होते. बिभीषण चौबे, रा.सिरसाव यांनी प्रशांतचा भाउ महेश घवले यास  मागील भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ करु लागला. प्रशांत भांडण सोडवण्यास गेले असता बिभीषण चौबे यांनी त्यांचे हातातील विळयाने नाकार मारुन जखमी केले.अशा मजकुराच्या  जयकुमार प्रशांत घवले यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं   324, 323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : दिनांक 03.07.2021 रोजी 14.45 वा सु तुगांव तांडा येथे मुक्ताबाई गहिनीनाथ इगवे या त्यांचे किराणा दुकानात असतांना अविनाश, रवि व भास्कर राठोड, प्रविण राठोड  व इतर तिघे अनोळखी व्यक्ती सर्व रा.तुगांव यांनी आम्हांला किराणा माल उधार का दिला नाही. असे म्हणुन  मुक्ताबाई यांचे गळयातील दिड तोळयाचे गंठण घेतले तसेच दुकानातील 9 ते 10 हजार रुपये घेतले, मुक्ताबाई यांचा मुलगा सोडवण्यास आला असता त्यास पण मारहाण केली. तसेच दुकानाचे शटर वरती कु-हाडीने मारुन दुकानाचे नुकसान केले. मुक्ताबाई  इगवे यांनी  दिनांक 06 जुलै रोजी  दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं   327, 452, 143, 147, 149,  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web