कळंब आणि मोहा येथे हाणामारी 

 
Osmanabad police

कळंब :   मोहा येथील गुणवंत मडके यांच्या पडीक शेतात भाउबंद सुमंत मडके  हे  दिनांक  08 जुलै रोजी 16.30 वा  गुरे चारत असतांना  गुणवंत यांनी आक्षेप घेतला. यावर सुमंत यांनी “ मी येथेच गुरे चारणार.”  असे   धमकावुन  गुणवंत यांना काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या  प्रथम खबरेवरुन  भादसं कलम  324 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.

दुस-या घटनेत रमेश ईखे यांच्या  कळंब येथील साप्ताहिक बाजार मैदानात उभ्या असलेल्या कारची काच फिरोज बागवान यांनी बुक्की मारुन फोडली. रमेश यांनी याचा जाब फिरोज यास विचारुन नुकसान भरपाई मागीतली असता फिरोज बागवान यांनी शिवीगाळ करुन  रमेश यांच्या चेह-यावर बुक्की मारुन व बाजुस पडलेली विट रमेश यांच्या डोक्यात फेकुन मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या  प्रथम खबरेवरुन  भादसं कलम  324,427,504 अन्वये गुन्हा नोदंविण्यात आला आहे.

 
फसवणूक 

 नळदुर्ग:   जळकोट येथील प्रफुल्ल कारले यांना बायो डिझेल  खरेदी करायचे असल्याने त्यांनी ऑनलाईन शोध घेउन गुजरात राज्यातील नागेशकुमार कटारीया यांच्याशी  दिनांक 05-07 जुलै दरम्यान अनेकदा  संपर्क साधला. यावेळी कटारिया यांनी 24,000 लिटर बायो डिझेल  खरेदी पोटी  6,30,000 रुपये अग्रीम रक्कम  मागितल्याने कारले यांनी कटारीया यांनी सांगितलेल्या खात्यात ती रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरली. परंतु कटारीया यांनी  कारले यांना  बायो डिझेल पाठवले नाही व रक्कमही परत केली नाही.अशा मजकुराच्या कराले यांनी दिले प्रथम खबरे वरुन भादसं कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web