काक्रंबा , मुर्शदापूर येथे हाणामारी 

 
Osmanabad police

तुळजापूर : चैतन्य मारुती माने, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 13 जुलै रोजी 18.00 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर, तुळजापूर येथे थांबले होते. यावेळी आशिष मोतिराम खंदारे, रा. तुळजापूर यांचा माने यांना धक्का लागल्याने माने यांनी त्यांना त्याचे कारण विचारले असता खंदारे यांनी माने यांना शिवीगाळ करुन काचेची बाटली माने यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या चैतन्य माने यांनी दि. 14 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा : मुर्शदापुर, ता. लोहारा येथील सुषमा रंगराव कांबळे कुटूंबीय व नातेवाईक यांचा गावकरी- करुणा बालाजी खरोसे कुटूंबीय व नातेवाईक अशा दोन्ही गटांचा दि. 11 जुलै रोजी 06.30 वा. सु. राहत्या गल्लीत जुन्या वादातून संघर्ष उद्भवला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुषमा कांबळे व करुणा खरोसे यांनी दिलेल्या परस्परविरोधी प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 325, 324, 452, 504, 506 अंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.


चार वर्षांपासून  पाहिजे असलेला आरोपी अटकेत

आंबी: भुम पो.ठा. गु.र.क्र. 10 / 2017 या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी- श्रीमती रबीली शिंदे, रा. अनाळा, ता. परंडा यांचा पोलीस शोध घेत होते. त्या गावी आल्याची गोपनीय खबर मिळताच आंबी पो.ठा. च्या पथकाने आज दि. 15 जुलै रोजी ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

                                                                                   

From around the web