जांब , देवकुरळी येथे हाणामारी 

 
Osmanabad police

भूम : निशीकांत आदिनाथ गुळवे, रा. जांब, ता. भुम हे दि. 26 जून 2021 रोजी 18.00 वा. सु. गावातील मारुती मंदीराच्या ओट्यावर बसलेले होते. यावेळी पुर्वीच्या वादावरुन नातेवाईक- गणेश व योगेश उमेश गुळवे या दोघा भावांनी निशीकांत यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लोखंडी पाईपने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या निशीकांत गुळवे यांनी दि. 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 (2), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : किसन श्रीरंग सराटे, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर हे दि. 10 ऑगस्ट रोजी 20.30 वा. आपल्या घरासमोर बसलेले असतांना नातेवाईक- अंगद भानुदास सराटे व ज्ञानेश्वर अंगद सराटे या दोघा पिता- पुत्रांनी पुर्वीचा वाद उकरुन काढून किसन सराटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली तसेच ज्ञानेश्वर यांनी किसन यांच्या डोक्यात हातोडी मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या किसन सराटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद : 1) परमेश्वर शिवाजी तवले, रा. हिंगळजवाडी  2) सिध्दार्थ जीवन ओव्हाळ, रा. येडशी, ता. उस्मानाबाद अशा दोघांनी दि. 11 ऑगस्ट रोजी 11.35 ते 12.15 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळील आपापल्या दुकानांत शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपनाचे कृत्य करुन भा.दं.सं. कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

केसरजवळगा येथे चोरी

मुरुम : बसवराज श्रीमंत जळकोटे, रा. केसरजवळगा, ता. उमरगा यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 10- 11 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडून आतील कपाटात असलेले 5 ग्रॅम सुवर्ण अंगठी व 20,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बसवराज जळकोटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web