अणदूर, आलूर, नागराळ येथे हाणामारी 

 
Osmanabad police

 नळदुर्ग: मागील भांडणाच्या कारणावरुन दि. 25 मे रोजी 23.00 वा. सु. चिवरी पाटी शिवारात अणदुर, ता. तुळजापूर येथील शिवाजी बनसोडे, जगन्नाथ कुंभार, अनिल कुंभार, नागेश गडदे अशा चौघांनी संगणमताने गावकरी-विश्वनाथ निवृत्ती गळाकाटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, वायरने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विश्वनाथ गळाकाटे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत सुभाष तुकाराम काळे, रा. अणदुर यांसह त्यांची पत्नी- श्रीदेवी, भाऊ- गोरख यांसह दि. 24 मे रोजी 12.00 वा. सु. अणदुर येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- निळकंठ करपे, युवराज करपे, योगेश तोगी, युवराज करपे, सुरज अशा पाच जणांनी, “आम्ही मशागतीसाठी पाठवलेले ट्रॅक्टर तुम्की परत का पाठवले.” असे नमूद काळे कुटूंबीयांस धमकावून शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गोरख व सुभाष या दोघा भावांस काठीने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करुन सुभाष यांच्या अपंगत्वास हिनवले. अशा मजकुराच्या सुभाष काळे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह अपंग अधिकार कायदा कलम- 92 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम: आलुर तांडा, ता. उमरगा येथील व्यंकट व सुनिल व्यंकट राठोड या दोघा पिता- पुत्रांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 26 मे रोजी 01.30 वा. सु. तांड्यावर गावकरी- प्रकाश तुकाराम चव्हाण यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लोहारा: नागराळ, ता. लोहारा येथील उमाकांत शेषेराव गोरे हे दि. 25 मे रोजी 20.15 वा. सु. लोहारा येथील आपल्या टेलरिंग दुकानासमोर होते. भाऊ- रमेश गोरे यांनी, “ तु माझ्या बारकडे नेहमी का येतोस तुझे काय काम आहे.” असे उमाकांत धमकावून शिवीगाळ करुन कत्तीने मारहान करुन जखमी केले. तसेच कत्तीचा धाक दाखवून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नागराळ गावातील दत्त मंदीरामध्ये बसवून ठेवले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उमाकांत गोरे यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 343, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web