आंबी आणि सावरगाव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

आंबी  : शेजाळ वस्ती, आंबी येथील गोकुळ शेजाळ यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 08 ऑगस्ट रोजी 02.30 वा. सु. गल्लीतील- मिरा शेजाळ यांना शिवीगाळ करुन लाकडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मिरा शेजाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : पिकातून मजूर नेल्याच्या व बांधावरुन रहदारीच्या कारणावरुन सावरगाव, ता. तुळजापूर येथील शिवराम व हनुमंत जाधव या दोघा पिता- पुत्रांना दि. 07 ऑगस्ट रोजी 19.30 वा. सु. गावातील देवीच्या मंदीरासमोर ग्रामस्थ- शिंदे कुटूंबातील हनुमंत, रामेश्वर, महादेव, गोकुळ अशा चौघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच शिवराम यांना कोयत्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शिवराम जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाया

उस्मानाबाद : वाल्मीक बोयने, रा. हंद्राळ, ता. उमरगा हे दि. 08 ऑगस्ट रोजी 18.15 वा. हंद्राळ येथील चौकात 5 ‍लि. गावठी दारु बाळगलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर अशोक काळे व शिंगलबाई काळे, दोघे रा. उस्मानाबाद हे याच दिवशी 17.35 व 18.40 वा. सु. उस्मानाबाद शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकुण 32 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद तीघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                  

From around the web