कोविड मनाई आदेश झुगारुन हॉटेल- दुकाने व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

परंडा : कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 25 जून रोजी 1)इरशाद कुरेशी  2)आसिफ या दोघांनी कुर्डवाडी रत्यावरील मांस विक्री दुकाने व्यवसायास चालु ठेवली असल्याचे परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत परंडा  पो.ठा. येथे 2 गुन्हे नोंदवले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - जमीर जैनुलअब्दीन शेख , रा. उस्मानाबाद यांनी दि. 24 जून रोजी 13.30 वा  टाटा एस  वाहन क्र. एम.एच. 04 एफ.यु. 2174  हा रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने माल भरुन चालवत असतांना तर दुस-या घटनेत संतोष कोकरे रा. येडशी हे टाटा एस  वाहन क्र. एम.एच. 25 ए.जे. 1663 मधुन भानसगाव गुंजेवाडी रत्यावर रहदारीस धोका अडथळा निर्माण होईल अशा रितीने माल भरुन चालवत असतांना  उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले.

 अपघात

तुळजापुर : विकास अशोक जाधव  वय 39 वर्षे, रा. सांगवी (मार्डी) हे दि. 21 जून रोजी 21.00 वा. सु. गावातील रार्ष्टीय महामार्गावरुन पायी जात होते. या वेळी तुळजापुर –सोलापुर जाणा-या कार क्रं. एम.एच.25 आर.6105 ने त्यांना धडक दिल्याने जाधव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक जखमीस उपचारकामी न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी स्वाती यांनी दि. 25 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web