कळंबमध्ये फायनान्स वसुली प्रतिनिधीचा सात लाखाचा अपहार  

 
Osmanabad police

 कळंब : कळंब येथील भारत फायनान्स शाखेचे प्रतिनिधी अमोल कदम रा.कौडगांव ता.उस्मानाबाद  यांनी मार्च 2020 ते ऑक्टोबर 2020 या काळात महिला बचत गटांकडुन मासीक हप्ते गोळा केले . तसेच महिला बचत गटांना  कर्ज देण्याच्या बहान्याने कर्ज फी पोटी रकमा घेतल्या. अशा प्रकारे कदम यांनी एकुण 6,91,026 रुपये गोळा करुन भारत फायनान्स मध्ये न भरता अपहार केला.

अशा मजकुराच्या व्यवस्थापक आकाश गाढवे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 409 अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.

चार  ठिकाणी चोरी 

नळदुर्ग : शेटे तांडा,धनगरवाडी येथील गणेश निसरगुंडे हे 25-26 जुन दरम्यानच्या रात्री घरात झोपलेले असतांना अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील 23 ग्रॅम सुवर्ण दागिने व 80,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या निसरगुंडे यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी : भालचंद्र मते यांच्या पाटोदा येथील हार्डवेअर दुकानासह शेजारच्या दुकानाचा कडी कोयंडा  25-26 जुन दरम्यानच्या रात्री गावातीलच दोघा व्यक्तींनी उचकटुन आतील  वेल्डींग मशीन,ड्रिलींग मशीन,ग्राईंडर मशीन,एस टी पी पम्प असे साहित्य व  5,300 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या मते  यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा: अशोक स्वामी यांच्या कोरेगाव शिवारातील शेतातुन 25-26 जुन दरम्यानच्या रात्री  सिआरआय 7.5 अश्व शक्ती विदुयत पम्प अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या स्वामी  यांनी दि. 26 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  ॲडव्होकेट उमर मोरवे रा.उस्मानाबाद  हे दिनांक 26 जुन रोजी शहरातील देशपांडे स्टॅन्ड येथे भाजीपाला खरेदी करत असतांना त्यांच्या शर्टच्या  खिशातील स्मार्ट फोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web