ढोकी : चोरीच्या लोखंडी सळईसह दोघे ताब्यात

 
z

ढोकी  : किणी येथील पांडुरंग कुंभार यांच्या दुकानाच्या शटरचे कुलुप अज्ञाताने दिनांक  09- 10 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री तोडुन आतील लोखंडी सळया ,सीसीटीव्ही असा 2,53,000 रुपये रकमेचा माल चोरुन नेल्याने ढोकी पो.ठा. येथे गु.र.क्र. 248 / 2021  भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा तपासास आहे.

            गुन्हा तपासात ढोकी पो.ठा. च्या सपोनि- श्री बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने माहिती घेतली असता हा गुन्हा माळकरंजा ग्रामस्थ- पांडुरंग लोमटे व पळसप ग्रामस्थ- नामदेव निकम यांनी केला असल्याचा संशय बळावला. पथकाने आज दि. 01.09.2021 रोजी नमूद दोघांना ताब्यात घेउन चोरीच्या मालापैकी लोखंडी सळई एका शेतातून जप्त केल्या असून उर्वरीत तपास चालू आहे.  

चोरी

तुळजापूर  : जयराम विभुते, रा. हंगरगा पाटी, ता. तुळजापूर हे दि. 25.08.2021 रोजी च्या रात्री आपल्या घरात झोपलेले असतांना पहाटे 04.00 वा. सु. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञाताने घरातील टेबलवर ठेवलेला स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या जयराम विभुते यांनी दि. 31 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web