कोवीड मनाई आदेश झुगारुन पानटपरी, हॉटेल, दुकान चालू ठेवणाऱ्यावर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले असुन यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना शनिवार व रविवार बंदीचा आदेश आहे. हे मनाई आदेश झुगारुन 1)तौफीक मुनीर कुरेशी 2) नवनाथ जग्गनाथ फुलसुंदर, दोघे रा. काटी, ता. तुळजापूर या दोघांनी दि. 18 जुलै रोजी अनुक्रमे गावातील आपले चिकन दुकान व पानटपरी व्यवसायास चालू ठेवली असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 3) समीर महम्मदशफी हन्नुरे, रा. परंडा यांनी याचा दिवशी परंडा येथील आपले चहाचे हॉटेल व्यवसायास चालू ठेवल्याचे परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
चोरीचे दोन गुन्हे दाखल 

वाशी : लक्ष्मण दगडु कोकाटे, रा. निपाणी, ता. भुम यांच्या निपाणी येथील शेतातील कुप नलीकेतील टेक्समो कंपनीचा विद्युत पंप व 1,000 फुट वायर तसेच गावकरी- बाळु माने यांच्या शेतातील 450 फुट वायर दि. 16 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या लक्ष्मण कोकाटे यांनी दि. 18 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : संदिपान नागुराव फुंड, रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद यांच्या सारोळा (भि.) गट क्र. 106 मधील शेतातील म्हैस दि. 17 जुलै रोजी 18.00 ते 21.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संदिपान फुंड यांनी दि. 18 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web