सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

 
सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद -  सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण होईल, मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करुन, निष्काळजीपणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 283, 279, 185 चे उल्लंघन करणाऱ्या 4 वाहन चालकांवर 4 गुन्हे  16 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) तेर, ता. उस्मानाबाद येथील अलीम बागवान यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 पी 4826 हा ढोकी- तडवळा रस्त्यावर रहदारीस धोकादायरित्या उभा केला असल्याचे ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) सुरेश लोंढे, रा. येडोळा यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 ई 9765 हा नळदुर्ग येथील अक्कलकोट रस्त्यावर रहदारीस धोकादायरित्या उभा केला असल्याचे तर विनोद चव्हाण, रा. हंगरगा (नळ) हे ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 13 एसी 7953 हा नळदुर्ग बसस्थानसमोरील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवत असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) उमरगा येथील लिंबराज स्वामी हे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 पी 297 हा साठे चौक, उमरगा येथील रस्त्यावर निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web