कोविड मनाई आदेश झुगारुन हॉटेल, दुकान चालू ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
नळदुर्ग - कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी आस्थापना चालू ठेवण्याची वेळ निश्चित केली असून त्या संबंधी विविध मनाई आदेश जारी आहेत. ते मनाई आदेश झुगारुन 1) फारुख अयुब पटेल 2) अब्दुला उलुम काजी 3) इम्तीयाज अहेमद फयाज, तीघे रा. नळदुर्ग यांनी दि. 22 जुलै रोजी नळदुर्ग येथील अपापल्या ताब्यातील अनुक्रमे गॅरेजची दोन दुकाने व चायनिज सेंटर व्यवसायास चालू ठेवले असलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल
उमरगा - नविन रमेश दरवेश, रा. ढोर गल्ली, उमरगा यांनी दि. 22 जुलै रोजी 21.00 वा. सु. पोलीस ठाण्याच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) चे उल्लंघन केले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोहेकॉ- मिलींद साकळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.