कोरोना संसर्ग :  निष्काळजीपणाची कृती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

परंडा :  कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी आदेश झुगारुन शेलगांव, ता. करमाळा येथील ऋषिकेश नवनाथ जानकर हे नाका- तोंडास मास्क न लावता दि. 21 ऑगस्ट रोजी 10.45 वा. सु. परंडा न्यायालयाच्या आवारात फिरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोकॉ- आण्णासाहेब लोमटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद  : सोनेगाव येथील संजय गोफणे यांनी आपल्या ताब्यातील वाहन क्र. एम.एच. 25 एजे 2334 मधून लोखंडी सळई भरून दि. 21 ऑगस्ट रोजी गावातील रस्त्यावर रहदारीस अडथल व जिवीतास धोका होईल अशा स्थितीत सळई वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. तर आकाश काळे, रा. उस्मानाबाद व सुशांत पवार, रा. वाघोली या दोघांनी याच दिवशी सकनेवाडी शिवारातील सुतमील समोरील रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ॲपे मॅझीक वाहने बेदरकारपने व निष्काळजीपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

मारहाण 

ढोकी : माळकरंजा, ता. कळंब येथील पांडुरंग लोमटे हे 20 ऑगस्ट रोजी 21.30 वा. ढोकी पेट्रोलपंप चौकात उभे होते. यावेळी कुमार गुंड, अनिल कोळी, मुक्तार शेख, अरबाज मशायक यांनी रस्ता अपघाताच्या जुन्या वादातून पांडुरंग यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काचेच्या बाटलीने मारहान करुन जखमी केले. यावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web