कळंब, उस्मानाबाद, नळदुर्ग येथे हाणामारीची घटना 

 
Osmanabad police

कळंब : कळंब येथील राजर्षी शाहु ईन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात गावकरी- इंद्रजितत गायकवाड यांसह तीन अनोळखी पुरुष दि. 04 ऑगस्ट रोजी 17.30 बाहेरुन अन्न  आनून जेवन करत होते. यावर  महाविद्यालय कर्मचारी- सत्येन अरुण शेळके यांनी त्यांना हटकल्याने नमूद चौघे तेथून निघून गेले. थोड्याच वेळाने त्या चौघांनी महाविद्यालय द्वारमंडपासमोर शेळके यांना गाठून, “तु कोण आम्हाला परत पाठवणारा.” असे धमकावून शिवीगाळ करुन कोयत्याने, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सत्येन शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : रोहीत रमेश खुने, रा. तुळजापूरनाका, उस्मानाबाद हे दि. 03 ऑगस्ट रोजी 14.00 वा. आपल्या घरात असतांना अंबेहोळ येथील शशिकांत गायकवाड यांसह सहा अनोळखी व्यक्तींनी खुने यांच्या घरासमोर गेले. “तु मार्च महिन्यात एक्साईज खात्यास खबर देउन माझी दारुची गाडी का पकडून दिली ? तु माझ्या सोबत नाही आला तर तुझी घरासमोरील गाडी फोडतो.” असे धमकावून रोहीत यांना वरुडा रस्ता उड्डान पुलाजवळील एका हॉटेलात नेउन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज,  काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रोहीत खुने यांनी दि. 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : वडाचा तांडा, ता. तुळजापूर येथील किसन लिंबा राठोड हे दि. 02 ऑगस्ट रोजी 18.00 वा. सु. पत्नीसह आपल्या घरात होते. यावेळी तांड्यावरील- कांत राठोड, अशोक राठोड, विकास राठोड, अनिल राठोड अशा चौघांनी संगणमताने पुर्वीच्या वादावरुन किसन यांसह त्यांची पत्नी व सुन यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किसन राठोड यांनी दि. 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web