परिचारिकेची नोकरी देतो म्हणून नळदुर्गच्या तरुणीची फसवणूक 

 
Osmanabad police

नळदुर्ग  :  उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची नोकरी देतो अशी भूलथापा एका तरुणीस  देऊन तीन लाखाची मागणी करून ३० हजार ऍडव्हान्स घेणाऱ्या एका भामट्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पाटील तांडा, नळदुर्ग येथील सुशिला पवार यांच्या मुलीस रुग्णालय परिचारीकेच्या नोकरीसंबंधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे बोलावणे आले होते. यावर जकनी तांडा, तुळजापूर येथील प्रेमनाथ राठोड उर्फ प्रविण याने, “माझी उस्मानाबाद जिल्हा परिषद अधिकाऱ्यांत चांगली ओळख असून मी नोकरी मिळवून देतो.” असे आमिष सुशिला पवार यांना दाखवून त्या पोटी 3,00,000 ₹ रकमेची मागणी केली. यावर सुशिला पवार यांनी दि. 21 मार्च 2021 रोजी त्यास  30,000 ₹ अग्रीम दिला होता. परंतु त्याने नोकरी तर मिळवून दिलीच नाही आणि रक्कमही परत न करता सुशिला पवार यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या सुशिला पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन ठिकाणी चोरी 

उमरगा : येळी येथील ‘भगवंत इलेक्ट्रीक मोटार रिवायडिंग’ या दुकानासमोर दुरुस्तीकरीता ठेवलेल्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या- 3, 6 अश्वशक्ती क्षमतेचे- 2, 5 अश्वशक्ती क्षमतेचा- 1 व 3 अश्वशक्ती क्षमतेचा- 1 असे एकुण 7 विद्युत पंप दि. 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या दुकान मालक- बलभीम रमेश पवार यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : शिवाजी संभाजी चिखले, रा. सांजा चौक, उस्मानाबाद यांची हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्हि 7043 ही दि. 17 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शिवाजी चिखले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web