सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उमरगा : उमरगा येथील त्रिशरण उत्तम गायकवाड व जयदेव उत्तम गायकवाड यांनी दि.23 ऑगस्ट रोजी 16.30 वा. सु. उमरगा ते चौरस्ता रस्त्याबाजूस आपापल्या हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने मालवाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद  : उसमानाबाद येथील सादिक खैराती मुजावर यांनी आपल्या ताब्यातील ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 25 एजे 1202 मधून लोखंडी पाईप भरून दि. 24 ऑगस्ट रोजी शहरातील सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका होईल अशा स्थितीत वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

परंडा : अहमदनगर येथील सचिन बबन तोरडमल यांसह त्यांच्या कुटूंबातील नितीन, निकेश, अमरदिप, लता, उषा असे सहाजण 24 ऑगस्ट रोजी माढा ते अहमदनगर अस प्रवास चारचाकी वाहनाने प्रवास करत होते. दरम्यान 18.15 वा. सु. वारदवाडी फाटा येथील आनंद हॉटेल येथे थांबले असता माढा, जि. सोलापूर येथील नातेवाईक- वैभव गायकवाड, साहिल घाडगे यांसह अन्य चार अनोळखी व्यक्तींनी नमूद तोरडमल कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, पाईपने मारहान करुन जखमी केले. तसेच साहिल यांनी उषा यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून तोरडमल यांच्या वाहनाची पुढील दिवा, टायर फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या सचिन तोरडमल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 324, 323, 427, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web