आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
परंडा : येवरड्या निवृत्ती पवार, वय 40 वर्षे, रा. रुई रोड, परंडा यांनी दि. 23 जुलै रोजी 05.00 वा. सु. आपल्या राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. “काशीमबाग येथील चोरीतील अडीच लाख रुपये दे, पैसे नसल्यास जागा विकुन पैसे दे.” या कारणावरुन येवरड्या पवार यास 1) सतिश शाबु भोसले, 2) लखन सतिश भोसले, दोघे रा. भवानवाडी, ता. भुम 3)उषा येवरड्या पवार, रा. रुई रोड, परंडा हे तीघे वेळोवेळी त्रास देत असल्याने या त्रासास कंटाळून येवरड्या पवार याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या राहुल निवृत्ती पवार, रा. काशीमबाग, परंडा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे दाखल
परंडा - आण्णासाहेब जाधव, रा. पिंपरी (आ.), ता. परंडा हे दि. 20 जुलै रोजी 11.00 वा. परंडा- करमाळा रस्त्यालगतच्या पेट्रोलिअम विक्री केंद्राजवळील एका हॉटेलमध्ये बसले होते. दरम्यान शिराळा ग्रामस्थ- युवराज, रेवन, हनुमंत व बुध्दीवान ढोरे यांसह विशाल गिलबीले, महावीर जगताप, योगेश वाघमोडे, राजा गायकवाड, दत्ता मेहेर, प्रशांत गायकवाड, अभिजीत पाटील अस 11 जण तेथे आले. जुना राजकीय वाद उकरुन काढून नमूद 11 जणांनी आण्णासाहेब यांना ठार मारण्याची धमकी देउन व शिवीगाळ करुन लाथाबुक्क्या, काठी, धारदार शस्त्राने मारहान केल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या आण्णासाहेब जाधव यांनी दि. 23 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम - कलदेवनिंबाळा येथील कोंडाबाई व लक्ष्मण पाटील या मायलेकरांनी शेजारी- बाबुराव घोटमाळे यांना दि. 23 जुलै रोजी 11.00 वा. शेत रस्त्यात टाकलेला मुरुम काढुन घेण्यास सांगीतले. यावर चिडून जाउन बाबुराव यांसह त्यांचा मुलगा- संजय व भाऊबंद- प्रभाकर, संतोष व राजु अशा पाच जणांनी नमूद मायलेकरांस शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन बांबू व दगडाने मारहान केली. अशा मजकुराच्या कोंडाबाई यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
वाशी : वय 18 वर्षे पुर्ण होण्यास अवघे 3 दिवस कमी असलेल्या एका तरुणीस गावकरी तरुणाने आमीष दाखवून दि. 22 जुलै रोजी मोटारसायकलवरुन तीच्या घरातून तीचे अपहरन केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.