उमरग्यात अवैध कत्तलीसाठी गुरे बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उमरगा  -  1) रसुन शमशेद्दीन शेख 2) सत्तार बासतसाब मुल्ला 3) नसिन शमिम सासतुर, तीघे रा. सय्यद बाशा दर्गा, उमरगा या तीघांनी दि. 21 जुलै रोजी 06.30 वा. सु. राहत्या गल्लीत आपापल्या ताब्यात तीन बैल अवैध कत्तलीसाठी बाळगले असल्याचे उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीस कॉन्स्टेबल- बाबुराव राऊत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5, 6, 9 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कचरा टाकल्याच्या कारणावरुन मारहाण 

उस्मानाबाद  - दिपाली बनसोडे, रा. बौध्दनगर, उस्मानाबाद या दि. 20 जुलै रोजी सकाळी 08.00 वा. सु. आपल्या घरासमोरील जागेची साफसफाई करत होत्या. यावेळी शेजारील अमृता बनसोडे, निताबाई बनसोडे, अजय व गोपाळ बनसोडे अशा चौघांनी घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरुन दिपाली व अस्मिता बनसोडे या दोघा बहिनींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिपाली बनसोडे यांनी दि. 21 लुजै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web