चोरीच्या विद्युत पंप व वायरसह दोघे अटकेत

 
d

उस्मानाबाद  - शेत शिवारातील सिंचन पंप चोरी शोधात असलेल्या स्था. गु. शा. च्या पोउपनि- श्री भुजबळ, पाहेकॉ- काझी, शेळके, पोना- घुगे, पोकॉ- सर्जे यांसह वाशी पो.ठा. चे पोहेकॉ- कुट्टे, पोकॉ- करवर अशा संयुक्त पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दि. 26 जुलै रोजी भुम तालुक्यातील निपाणी गावात छापा टाकला. यावेळी गावकरी- ज्ञानेश्वर अल्हाट व उमेश खंदारे यांच्या ताब्यात आढळलेला कुपनलिका विद्युत पंप व वायर विषयी पथकाने माहिती घेतली असता नमूद माल शेतातील कुपनलिकेतून चोरीस गेल्यावरुन वाशी पो. ठा. येथे गु.र.क्र. 225 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल असल्याचे समजले. यावरुन नमूद माल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. 


कोविड मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

परंडा  -  कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी आस्थापना चालू ठेवण्याची वेळ निश्चित केली असून त्या संबंधी विविध मनाई आदेश जारी आहेत. ते मनाई आदेश झुगारुन 1) गोपाळ काशीनाथ जगताप 2) गणेश रामकृष्ण पवार, दोघे रा. वाकडी, ता. परंडा यांनी दि. 26 जुलै रोजी 20.00 वा. सु. वारदवाडी फटा येथील अपापल्या ताब्यातील अनुक्रमे राजे हॉटेल व प्रतिक हॉटेल व्यवसायास चालू ठेवले असलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 
भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब  : संजय रोहीदास गायकवाड, रा. कल्पनानगर, कळंब यांनी दि. 26 जुलै रोजी 13.40 वा. पंचायत समिती कार्यालय, कळंब समोरील रस्त्यावर महिंद्रा वाहन क्र. एम.एच. 25 आर 3749 हे रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने व बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले. यावरुन पोहेकॉ- साधु शेवाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web