बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर भूम आणि उस्मानाबाद येथे गुन्हे दाखल

 
Osmanabad police

भूम  : कैलास महादेव जाधव, रा. भुम यांनी दि. 28 ऑगस्ट रोजीच्यापुर्वी दुधोडी गावातील गट क्र. 530 मधील त्यांच्या शेतात गौण खनिजाचे बेकायदेशीररित्या उत्खनन करुन दगड- 20 ब्रास, लहाण डस्ट- 81 ब्रास, मोठी खडी- 180 ब्रास बनवून एकुण 16,67,735 ₹ रकमेच्या गौण खनिजाची चोरी केली.

दुसऱ्या घटनेत शिवशंकर पांडुरंग पौळ, रा. भुम यांनी दि. 28 ऑगस्ट 2021 पुर्वी भुम येथील गट क्र. 190 मधील त्यांच्या शेतात गौण खनिजाचे बेकायदेशीररित्या उत्खनन करुन मोठी खडी- 78 ब्रास, लहान डस्ट- 25 ब्रास बनवून एकुण 6,11,305 ₹ रकमेच्या गौण खनिजाची चोरी केली.

यावरुन मंडळ अधिकारी- श्री. शिवदास पाटील व  श्री. संजय स्वामी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह गौन खनिज कायदा कलम- 4, 5 सह माईन्स ॲन्ड मिनरल ॲक्ट कलम- 21 (1) अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद : सुर्यास्त ते सुर्योदयादरम्यान गौण खनिज उतखन्न- वाहतूकीस मनाई असल्याने उस्मानाबाद महसुल कार्यालयाचे पथक दि. 21 ऑगस्ट रोजी अवैध गौण खनिज विरोधी मोहिमेवर होते. दरम्यान 22.00 वा. सु. सुकन भैय्या विधाते, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने शिंदेवाडी गट क्र. 314 मध्ये 20 ब्रास मुरुम व दगड अवैधरित्या उत्खनन करुन त्याचे ढीग लावले. यावरुन तलाठी- विश्वास वायचळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम कलम- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web