बँकेची फसवणूक करणाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

तुळजापूर : रशीद अल्लाउद्दीन नदाफ, रा. आरबळी, ता. तुळजापूर व सद्दाम नसीर शेख, रा.मोहोळ, जि. सोलापूर या दोघांनी संगणमत करुन 65 ग्रॅम वजनाचे खोटे व बनावटी सोन्याचे दोन लॉकेट सोने तारण कर्ज प्राप्तीसाठी दि. 23 ऑगस्ट रोजी 11.30 वा. सु. आयसीआयसी बँक शाखा- तुळजापूर येथे ठेउन बँकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या बँक व्यवस्थापक- सुनिल क्षिरसागर यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 420, 511, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद : मंथन मैरान, रा. बालाजीनगर, उस्मानाबाद यांच्या ओमनगर, उस्मानाबाद येथील वित्त व्यवस्था कार्यालयाचे शटर हुक अज्ञाताने दि. 25- 26 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री कापून कार्यालयातील स्टेशनरी साहित्य असलेले एक लोखंडी कपाट व 25,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम  : धनराज पाटील, रा. येणेगूर, ता. उमरगा यांच्या शेतातील दोन चंदनाची झाडे दि. 23- 24 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री गावातीलच संशयीतांनी चोरुन नेली आहेत. अशा मजकुराच्या धनराज पाटील यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

भूम  : देवळाली, ता. भुम येथील झुंबर गायकवाड हे दि. 25 ऑगस्ट रोजी 18.00 वा. सु. गावातील रस्त्याने स्कुटर चालवत जात होते. दरम्यान गायकवाड यांच्या स्कुटरच्या आरशाचा धक्का ग्रामस्थ- दिपक गायकवाड यांना लागला असता त्यांनी चिडून जाउन गायकवाड कुटूंबातील अजय, बबन, अदिनाथ, बप्पा, बापु  यांसह सागर घोडे अशा सात जणांनी झुंबर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, चाकू, काठीने मारहान करुन झुंबर यांना जखमी केले. यावेळी झुंबर यांचे कुटूंबीय त्यांच्या बचावास सरसावले असता नमूद सात जणांनी त्यांनाही मारहान केली. यावरुन झुंबर गायकवाड यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web