ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी बिहार राज्यातून अटक 

उस्मानाबादच्या सायबर पोलिसांना यश 

 
d

उस्मानाबाद  -  मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असुन तुम्हाला एक लाख  रक्कमेचे  कर्ज मंजूर  झाले आहे, अशी भूलथापा देवून  सकनेवाडी येथेही एकास ३० हजार रुपयाला गंडा घालणाऱ्या आरोपीस बिहार राज्यातून अटक  करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. 


शरद नामदेव सिरसाठ, रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद यांना दि. 29.12.2020 रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन कॉल आला. त्या कॉलवरील व्यक्तीने “मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असुन तुम्हाला 1,00,000 ₹ रकमेचे कर्ज मंजुर झाले आहे.” असे सिरसाठ यांना सांगून  कर्ज प्रक्रीयेसाठी त्यांच्याकडुन एकुण 30,299 ₹ रक्कम त्या कॉलवरील व्यक्तीने सांगीतलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगुन सिरसाठ यांची फसवणूक केली होती. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 268 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) प्रमाने दाखल आहे.

            गुन्हा तपासात सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील, पोहेकॉ- कुलकणी, पोना- संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोकॉ- आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांच्या पथकाने आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषन केले असता हा गुन्हा राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी, वय 21 वर्षे, रा. भागलपुर, राज्य बिहार याने केल्याचे निष्पन्न झाले.

 या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोउपनि- अनिल टोंगळे, पोहेकॉ- किशोर रोकडे, पोकॉ- गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने भागलपुर, राज्य बिहार येथे 7 दिवस तपास करुन आरोपी- राहुल कुमार यास अटक करुन आज दि. 20 जुलै रोजी उस्मानाबाद येथे आणले  असून  गुन्ह्याचा उर्वरीत तपास सायबर पो.ठा. च्या पोनि- श्रीमती अर्चना पाटील या करत आहेत

From around the web