उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया

 

नळदुर्ग: ईटकळ, ता. तुळजापूर येथील नजिर यासिम शेख हे 27 मार्च रोजी गावातील गौराई ट्रेडर्स दुकानात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 710 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

उस्मानाबाद -  जुगार चालू असल्याच्या खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने शहरातील नाईकवाडी नगर येथे छापा मारला. यावेळी 1)अरविंद राठोड 2)सौरभ राठोड 3)अर्जुन पवार 4)मुरली विभुते 5)किशोर किरदत्त 6)संजय तनमोर, सर्व रा. उस्मानाबाद 7)लक्ष्मण ढोबळे, रा. खानापुर 8)समीर शेख, रा. आंबेहोळ हे सर्वजण शेळके यांच्या पत्रा शेडमध्ये ऑनलाईल चक्री मटका जुगार चालवण्याचे साहित्यासह एक संगणक संच असा एकुण 18,600 ₹ चा माल बाळगले असतांना पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नेांदवले आहेत.

 
अवैध मद्य विरोधी कारवाया

उस्मानाबाद पोलीसांनी काल शनिवार 27 मार्च रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 8 कारवाया करुन गुन्ह्यातील गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला व अवैध मद्य जप्त करुन 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 8 गुन्हे नोंदवले आहेत.

(1) उमरगा पो.ठा. च्या पथकाने उमरगा पो.ठा. हद्दीत 5 वेगवेगळ्या ठिकाणे छापे मारले असुन यात 1)दत्ता वाघमोडे, रा. उमरगा हे महात्मा फुले नगर, उमरगा येथे 5 लि. गावठी दारु बाळगलेले 2)विश्वनाथ मकाळे, रा. नाईचाकुर हे राहत्या घरासमोर देशी दारुच्या 10 बाटल्या अवैधपणे बाळगलेले 3)माधव मोरे, रा. बोरसुरी, ता. निलंगा हे चौरस्ता उमरगा येथील बिरुदेव मंदीराजवळ देशी दारुच्या 15 बाटल्या व 20 लि. गावठी दारु अवैधपणे बाळगलेले 4)दुर्गप्पा घोटने, रा. झोपडपट्टी तुरोरी, ता. उमरगा हे राहत्या भागात 10 लि. गावठी दारु बाळगलेले 5)मंजुषा ममाळे, रा. कदमापुर, ता. उमरगा या गावशिवारात गावठी दारु निर्मीतीचा 1,000 लि. द्रवपदार्थ बाळगलेल्या पथकास आढळल्या.

(2) नान्नजवाडी, ता. भुम येथील सुदर्शन काटे हे अंबी फाटा येथे देशी दारुच्या 48 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) सातेफळ, ता. कळंब येथील विक्रम जगताप हे आपल्या राहत्या घरी देशी- विदेशी दारुच्या 9 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) अंजनसोंडा, ता. भुम येथील दादा मोटे हे आपल्या राहत्या घराच्या मागे देशी दारुच्या 8 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web