उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई
Jul 21, 2021, 18:42 IST
लोहारा - संतोष शंकर थोरात, रा. धानुरी, ता. लोहारा हे दि. 20 जुलै रोजी 18.40 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 540 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाईतील जप्त मद्य नष्ट
उस्मानाबाद - अवैध मद्य विरोधी कारवायांदरम्यान पोलीस दलाने जप्त केलेले अवैध श्रमद्य व मद्य उत्पादन साहित्य पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवले असल्याने मुद्देमाल कक्षास गुदामाचे व बकाल स्वरुप येते. नुकताच न्यायालयाच्या आदेशाने आनंदनगर पोलीस ठाण्याने 15 गुन्ह्यांतील अवैध मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीत नष्ट केला.