उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पोलीसांनी  16 एप्रील रोजी 11.20 वा. अणदुर-खुदावाडी रस्त्यावर कस्तुरे यांचे शेतातील धाब्याचे पाठीमागे छापा टाकला असता विश्वनाथ मनोहर करपे हे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या  180 मि. ली.च्या  8 बाटल्या जवळ बाळगल्या असतांना  आढळले.

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांनी 16 एप्रील रोजी 18.45 वा. सकनेवाडी शिवारातील तुळजाई हॉटेल समोर छापा टाकला असता सागर अनंत मगर रा. वाघोली हे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 5 व विदेशी दारुच्या 7 बाटल्या बाळगला असतांना आढळले.

 मुरुम : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी 16 एप्रील रोजी 16.00 वा. महादेव नगर, मुरुम येथे छापा टाकला असता दत्ता शिवाप्पा देडे हे अवैध विक्रीच्या उद्देशाने 20 लीटर सिंदी जवळ बाळगली असतांना आढळले.

 बेंबळी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन बेंबळी पोलीसांनी 16 एप्रील रोजी 17.40 वा. अंबेवाडी चौक येथे छापा टाकला असता सुनिल दशरथ कदम हे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 17 बाटल्या जवळ बाळगला असतांना आढळले.

यावरुन पोलीसांनी नमुद मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदयांतर्गत 4 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांत नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई

तामलवाडी : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन  तामलवाडी पोलीसांनी  16 एप्रील रोजी देवकुरळी येथे छापा टाकला. यावेळी देविदास नवगिरे, गौतम ताकमोघे, दत्तात्रय जाधव, कोंडीबा राउत, ‍जिवन कांबळे, सर्व रा. देवकुरळी ता. तुळजापुर  हे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहीत्य व 1680 ₹ रकमेसह आढळले. या वरुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web