अणदूरमध्ये लैगिंक अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल 

 

अणदूर - अणदूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी लैगिंक अत्याचार केला होता, त्यातील तिसरा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्याची शाई वाळते न वाळते तोच अणदूरमध्ये आणखी एक लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 


लग्नाचे अमिष दाखवून  एका महिलेवर मागील दोन वर्षांपासून लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी  अल्ताफ लालडू इनामदार  याच्याविरुद्ध पोलिसांनी भा द वि 376(2), 323,504,506 प्रमाणे  एफआयआर दाखल केला आहे. 

पीडित महिला नवरा त्रास देत होता म्हणून माहेरी अणदुर येथे  मोलमजुरी करुन जीवन जगत होती. तिला लग्नाचे अमिष दाखवुन मागील दोन वर्षांपासून अल्ताफ लालडू इनामदार हा लैगिंक अत्याचार करीत होता. 

दमदाटी करून आणि मारहाण करून आपल्या  इच्छेविरुद्ध  अल्ताफ लालडू इनामदार याने शारीरीक संबंध ठेवल्याची तक्रार संबंधित महिलेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली आहे  त्या पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन  नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये अल्ताफ लालडू इनामदार याच्यावर  भादंवि  376(2), 323,504,506 प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस  अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहाने करीत आहेत

From around the web