अंजनसोंडा, महालिंगरायवाडी, गोलेगाव येथे हाणामारी 

 
Osmanabad police

वाशी : अंजनसोंडा, ता. भुम येथील गुणवंत सर्जेराव मोटे हे दि. 28.08.2021 रोजी 09.30 वा. सु. गिरवली गावातील बसथांब्याजवळ उभे होते. यावेळी ग्रामस्थ- सज्जयन मोटे, अजय मोटे, कृष्‌णा काटकर, मदन काटकर अशा चौघांनी तेथे जाउन शेतजमीन वाटणीच्या पुर्वीच्या वादावरुन गुणवंत मोटे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच गुणवंत यांच्या घराकडे जाउन त्यांच्या कुटूंबीयांनाही शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गुणवंत मोटे यांनी दि. 31 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : महालिंगरायवाडी, ता. उमरगा येथील सुवर्णा श्रीकांत भुरे यांसह त्यांचे 4 कुटूंबीय यांचा गावातीलच शोभाबाई विनायक जाधव यांसह त्यांचे 3 कुटूंबीयांशी शेत रस्त्याच्या कारणावरुन वाद आहे. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन महालिंगरायवाडी शेत शिवारात दि. 28.08.2021 रोजी 17.00 वा. सु. दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व काठी, दगड, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. तसेच जाधव यांच्याकडून ट्रॅक्टरने भुरे यांच्या शेतातील पाईपलाईनचे आर्थिक नुकसान झाले तर  या मारहानीत शोभाबाई यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या श्रीकांत भुरे व शोभाबाई जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

परंडा  : मिस्त्री- नतु उत्तम ठाणांबीर, रा. गोलेगाव, ता. भुम हे दि. 30 ऑगस्ट रोजी 13.30 वा. पारधी पिढी, गोलेगाव येथे कामासाठी मजुर शोधण्याकामी गेले असता पिढीवरील अशोक शिंदे, सुनिल शिंदे, कल्याण शिंदे, चिंगु शिंदे अशा चौघांनी पुर्वीच्या वादावरुन नतु ठाणांबीर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गाजाने डोक्यात मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नतु ठाणांबीर यांनी दि. 31 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web