अणदूरमध्ये जनावरांचा मृत्यु, गुन्हा दाखल

 
Osmanabad police

नळदुर्ग  :  अणदुर येथील बाबु धोना राठोड यांचे शेत गडी- प्रभाकर पवार हे दि. 11 ऑगस्ट रोजी 11.00 वा. सु. अणदुर शिवारातील लंगडे तलावाच्या बांधावरुन जनावरे घेउन जात होते. यावेळी शेता शेजारील ग्रामस्थ युवराज, सोनुबाई, शिवाजी, कविता या चौघा राठोड कुटूंबीयांनी शेतात जनावरे आल्याच्या कारणावरुन पवार घेउन जात असलेल्या दोन बैलांना तलावाच्या पाण्यात ढकलल्याने ते बैल पाण्यात बुडून मरन पावले. यावरुन बाबु राठोड यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 429, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे 

ढोकी  : समाधान विक्रम पुंड, रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद हे दि. 14 ऑगस्ट रोजी 09.30 वा. पारधी पिढी, पळसप येथील रस्त्याने जात होते. यावेळी पळसप वस्तीवरील- मधु पवार, सुनिल पवार व त्याचा भाउ अशा चौघांनी पुर्वीच्या वादावरून समाधान यांना अडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समाधान पुंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : मसला (खु.), ता. तुळजापूर येथील राजेंद्र बळीराम शिंदे यांच्या शेत विहीरीतील गाळ शेजारच्या भारत शिंदे यांच्या शेतात पडत असल्याने भारत यांसह त्यांचा भाऊ- नितीन यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी 10.00 वा. सु. राजेंद्र शिंदे यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन झाडाच्या फोकाने मारहान करुन चावा घेतला. यात राजेंद्र यांच्या गालावर मार लागुन त्यांचा एक दात निखळून पडल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 325, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web