कावलदरा येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला 

 
कावलदरा येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

उस्मानाबाद - येथील उस्मानाबाद ग्रामीण ता.जि.उस्मानाबाद येथे आकस्मात मृत्यू.खबर देणाराचे नाव-किरण सुरेश पवार वय-26 वर्षे व्यवसाय-पोलीस पाटील/शेती रा.कावलदरा जि.उस्मानाबाद.मयताचे नाव-अनोळखी पुरुष जातीचे इसम अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा.मयत-दि.13 एप्रिल-2021 रोजीचे 13.00 वाजचे पुर्वी कावलदरा गावाजवळून जाणारे NH-52 रोडवरील ब्रिज खाली वेळ-समजून येत नाही.वरील नमूद ता.वेळ व ठिकाणी एक इसम अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा पुरुष मयत आवस्थेत पडलेला दिसला त्याचे नाव काहीएक माहिती नाही अगर त्याची ओळख नाही.तरी पुढील कार्यवाहीसाठी  अशी खबर वरुन नमूद प्रमाणे आकस्मात मृत्यू दाखल करुन पुढील तपास सुरु आहे. 

घटनास्थळी एक पुरुष जातीचे इसम मयत आवस्थेत मिळून आल्याने त्याचे अंगाववर भगव्या रंगाचा फुल बाहयाचा शर्ट,L साईजचा Orauge  कॉलर मार्क असलेला,एक निळया रंगाची TIGER कंपनीचे लेबल असलेली जिन्स फूल पॅन्ट 32 CM साईजची.एक चॉकलेटी रंगाची अंडरविअर EXODA कंपनीची 85 CM साईजची.काळया रंगाची,लाल रंगाची कडा असलेला स्पोर्टस बनियान ESSDEE कंपनीचा 90 CM साईजचा.पॅन्टच्या पाठीमागील खिशात लाल व काळया रंगाचा चौकडा हातरुमाल.प्रेतापासून 10 फूट अंतरावर porgon कंपनीची काळया रंगाची रबरी.08 नंबरची चप्पल.कंबराला पाचरंगी करदोडा.गळयात लाल रंगाचे दौऱ्यामध्ये पांढऱ्या धातुचा ताईत कॅप्सुलचे  आकाराचा.उजव्या हातात एक भगव्या रंगाचा मनगटी धागा त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे मण्यामध्ये ओम असलेला, व हिरव्या व भगव्या रंगाचा एकत्रित मनगटी धागा असे वर्णनाचे साहित्य मिळून आलेले आहे.

         कोणाचे पुरुष वय 35 ते 40 वर्षे वयाचे नातेवाईक मिसींग अथवा किडनॅप झालेले असल्यास पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण ता.जि.उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा,संपर्क क्रमांक पो.नि.डी.एन.सुरवसे मो.नं.9096542266,सपोनि.वाय.बी.शिंदे मो.नं.9403865681   असे आहेत.येथे संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन,उस्मानाबाद(ग्रा.) यांनी केले आहे.

From around the web