उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य  विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाई

उमरगा : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन  उमरगा पोलीसांनी 17 एप्रील रोजी तीन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या छाप्यात किशोर बंडुपंत पाठक, रा. मुळज हे 15.10 वा. तलमोड बस थांबा समोर कल्याण मटका जुगार चालविण्याच्या उददेशाने जुगार साहीत्य व 1410 ₹ रकमेसह आढळले. तर दुस-या छाप्यात राम हणुमंत पाटील, वय 45 वर्षे रा. धाकटेवाडी हे 15.40 वा. तलमोड बस थांबा येथे कल्याण मटका जुगार चालविण्याच्या उददेशाने जुगार साहीत्य व 940 ₹ रकमेसह आढळले. तर तिस-या छाप्यात प्रविण इंद्रजित कांबळे, वय 28 वर्षे  हे 16.30 वा. तुरोरी येथे कल्याण मटका जुगार चालविण्याच्या उददेशाने जुगार साहीत्य व 1040 ₹ रकमेसह आढळले. यावरुन तीघांविरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत.

नळदुर्ग : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन नळदुर्ग पोलीसांनी  17 एप्रील रोजी इटकळ शिवारात छापा टाकला. यावेळी युनुस ईस्माईल्‍ मकानदार, समीर जब्बार मुजावर, असलम कासीम नदाफ, संदीप भागवत राठोड, दिपक दत्ता पाटील हे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहीत्य व 6020 ₹ रकमेसह आढळले. यावरुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पोलीसांनी 17 एप्रील रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या छाप्यात हसन करीम शेख, रा. नंदगाव  हे 18.50 वा. नंदगाव येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगला असतांना आढळले. तर दुस-या छाप्यात प्रकाश हिरा राठोड, मल्हारी नामदेव गायकवाड, दोघे रा. खुदावाडी हे 20.30 वा. नळदुर्ग येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने बिअरच्या 24 बाटल्या बाळगले असतांना आढळले.

लोहारा : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन लोहारा पोलीसांनी 17 एप्रील रोजी 12.20 वा. कानेगाव छापा टाकला असता बालाजी कुंडलीक कांबळे रा. कानेगाव हे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या  16 बाटल्या बाळगला असतांना आढळले.

 ढोकी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पोलीसांनी 17 एप्रील रोजी 12.40 वा. तेर येथे छापा टाकला असता अनिकेत सुब्राव लोखंडे वय 21 वर्षे रा. ढोकी हे अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या  8 बाटल्या बाळगला असतांना आढळले.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद शहर : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद  पोलीस पथकाने 17 एप्रील रोजी 18.05 वा. उस्मानाबाद शहरातील पद्मीनी मराठा खानावळ येथे छापा टाकला असता बालाजी वसंतराव जठार वय 54 वर्षे रा. खाजानगर, उस्मानाबाद हे अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या  11 बाटल्या बाळगला असतांना आढळले.

यावरुन पोलीसांनी नमुद मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदयांतर्गत 5 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांत नोंदवले आहेत.

From around the web