येरमाळा चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेत

 
येरमाळा चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेत

येरमाळा:  येरमाळा  येथे गु. र. नं. 45/2021 भा. दं. सं. कलम- 379 अंतर्गत हा दाखल आहे. तपासा दरम्यान स्थागुशाच्या पोनि गजानन घाडगे यांच्या पथकातील सपोनि- निलंगेकर, पोहेकॉ-काझी, पोशि- सावंत, ढगारे यांनी गुन्हयाची कार्यशैली अभ्यासली.  अखेरीस सुरज ऊर्फ बापु दादासाहेब शिनगारे, वय 25 वर्षे, रा. शेलगाव (ज) ता. कळंब यास दि. 16 एप्रिल रोजी ताब्यात घेतले.  नमुद लुटलेला  ट्रॅक्टर हे नमुद आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आले असुन त्यांना उर्वरीत तपास कामी पो. ठा. येरमाळा येथे हस्तांतरीत करण्यात आले आहे.   

चोरी

उस्मानाबाद - रियाज गयाजोददीन शेख, रा. उस्मानाबाद यांची मो. सा. क्र. एम. एच. 25 एबी 8638 ही 08 ते 09 एप्रिल रोजीच्या दरम्यान घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रियाज शेख यांनी दि. 16 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 आंबी : दिलीप शंकर गाडवे रा. सोनारी ता. परंडा यांच्या घराचा दरवाजाचे कडी-कोंडा अज्ञाताने  16 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री तोडुन घरातील कपाटातील 46,000 रु. किंमतीचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या दिलीप गाडवे यांनी दि. 16 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

मुरुम : आप्पाराव गंगाराम चव्हाण, रा. कोथळी तांडा, मुरुम हे 10 एप्रिल रोजी 19.30 वा. मुरुम ते मुरुम फाटा असे मोटार सायकलन बुलेट क्र. एम. एच. 13 सीएक्स 1404 ने जात होते. यावेळी इनोव्हा कार क्र. एम. एच. 12 डीवाय 1305 चा चालक-रामेश्वर वाघमारे, रा. कोथरुडख्‍ पुणे यांनी इनोव्हा कार हे हयगय व निष्काळजीपणे चालवुन चव्हाण यांच्या बुलेटला धडक दिली. या अपघातात आप्पाराव चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या आप्पाराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम 279, 338, 427 आणि मो. वा. का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web