रस्ता लुटमारीतील चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद - नळदूर्ग येथील फुलवाडी टोलनाक्यापुढे 2 कि.मी. अंतरावर रस्त्यावर मध्यरात्री जॅक दिसल्याने मिनीट्रक चालकाने तो जॅक आपल्याला घेण्यासाठी ट्रक थांबवला असता अंधारात दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी ट्रक चालकास धाक दाखवून ट्रक मधील साहित्य लुटून नेले होते. यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 204 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री माने, पोना- सय्यद, पोकॉ- जाधवर, आरसेवाड यांचे पथक करत होते.
पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा येथील सुरज छगन शिंदे, वय 22 वर्षे यास पथकाने दि. 16 जुलै रोजी तेरखेडा येथून ताब्यात घेतले असता नमूद लुटीतील एक स्मार्टफोन त्यांच्या ताब्यात आढळल्याने पथकाने नमूद स्मार्टफोन व लुटीस वापरलेली त्याची मोटारसायकल जप्त करुन त्यास अटक केले आहे. लुटीतील उर्वरीत माल व त्याच्या साथीदारांचा तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
तीन आरोपींस आर्थिक दंडाची शिक्षा
उस्मानाबाद - कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन व कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम- 188, 269 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी आज दि. 17 जुलै रोजी खालीलप्रमाणे शिक्षा सुनावल्या. यात उस्मानाबाद (श.) पो.ठा. हद्दीत नमूद कलमांचे उल्लंघन करणाऱ्या 1) अल्ताफ जैनोद्दीन शेख 2) गंगाधर श्याम गिरी या दोघांना अनुक्रमे 300 ₹ व 200 ₹ दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा तर बेंबळी पो.ठा. हद्दीत उल्लंघन केल्याप्रकरणी 3) अविनाश सुरेश कापसे यांना 1,000 ₹ दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची सुनावली आहे.
सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यास 200 ₹ दंडाची शिक्षा
उस्मानाबाद - संतोष सोमनाथ कोकरे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका, अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहन उभे करुन भादसं कलम 283 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना आज दि. 16 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 200 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.