अंबीत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटकेत

 
sd

अंबी  : मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन अंबी पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल असलेल्या गु.र.क्र. 119 / 2021 च्या तपासादरम्यान अंबी पो.ठा च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोना- सिध्देश्वर शिंदे, पोकॉ- गायकवाड, चौघुले, फिरोज शेख, अर्चना भोसले यांच्या पथकाने करमाळा तालुक्यातील रायगाव ग्रामस्थ- लखन पवार यास काल दि. 12 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात नमूद चोरीची मोटारसायकल आढळल्याने त्यास अटक करण्यात आली असून उर्वरीत तपास चालू आहे.

 पाच आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

उस्मानाबाद : उमरगा पो.ठा. हद्दीत जुगार खेळणाऱ्या संजय जाधव व अमीन पटेल या दोघांना म.जु.का. कलम- 12 (अ) च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा तर ग्रामीण पो.ठा. हद्दीत कोविड संसर्गाची शक्यता होईल अशी निष्काळजीपनाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या चेतन कदम, रा. येडशी यांच्यासह सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने, धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्या परमेश्वर नवले, रा. हिंगळजवाडी व सिध्दार्थ ओव्हळ, रा. येडशी अशा तीघांना प्रत्येकी   1,000 ₹ दंडाची शिक्षा अनुक्रमे उमरगा व उस्मानाबाद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली आहे.

रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

शिराढोण  : 1) विश्वनाथ जाधवर 2) राहुल जाधवर 3) शिवाजी जाधवर, तीघे रा. ताडगाव, ता. कळंब 4) राम उपाडे, रा. बोरगाव (का.), ता. लातुर या सर्वांनी दरम्यान कळंब- लातुर रस्त्यावर दि. 12 ऑगस्ट रोजी 10.00 ते 12.00 वा. अनुक्रमे तीन ट्रॅक्टर व एक एक्सकॅव्हेटर यंत्र रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने भर रस्त्यात लावून भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.

 
मनाई आदेश झुगारुन पानटपरी व्यवसायास चालू ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद : चेतन मधुसूदन कदम, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी 21.45 वा. सु. येडशी येथे चौकातील आपली पानटपरी व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web