चोरीच्या मोटारसायलसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद : ईट, ता. भुम येथील श्याम जालिंदर भोसले उर्फ जहाळ्या हा नुकतीच एक हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल बाळगु लागला आहे. अशी बातमी खबऱ्यामार्फत स्था.गु.शा. च्या पोउपनि- माने, पोकॉ- जाधवर, मारलापल्ले, आरसेवाड यांच्या पथकास मिळताच पथकाने दि. 18 जुलै रोजी श्याम यास नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्या मोटारसायकलची मालकी- ताबा याविषयी माहिती घेतली असता ती मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन भुम पो.ठा. गु.र.क्र. 106 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने नमूद मोटारसायकल जप्त करुन व श्याम यास अटक करुन पुढील कार्यवाहिस्तव भुम पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
एका आरोपीस आर्थिक दंडाची शिक्षा
उस्मानाबाद - पोलीस ठाणे : कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन व कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम- 269 चे उल्लंघन केल्याप्रकरणी सुंदर सुभाष धावारे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद यांना 1,000 ₹ दंड व दंड न भरल्यास तीन दिवस साध्या कारावासाची शिक्षा आज दि. 19 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद सुनावली आहे.