चोरीच्या चार मोटारसायकल व चार भ्रमणध्वनीसह आरोपी ताब्यात
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाकी स्था.गु.शा. च्या पोनि- . गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोना- अमोल चव्हाण, हुसेन सय्यद, कावरे, माने, पोकॉ- आरसेवाड, मरलापल्ले, सर्जे यांचे पथक आज दि. 30 ऑगस्ट रोजी पहाटे गस्तीस होते.
दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाटोदा पाटी येथील अविनाश दिलीप भोसले हा जुना बस डेपो पारधी पिढी, उस्मानाबाद येथील एका विट भट्टीमागील शेडमध्ये काही दिवसांपासून मोटारसायकली व भ्रमणध्वनी संशयीतरित्या बाळगून आहे. यावर पथकाने पहाटे 05.30 वा. अविनाश भोसले यास ताब्यात घेतले असता तो ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 231 / 2021 या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे समजले.
पथकाने त्याच्या ताब्यात असलेल्या 4 मोटारसायकल व 4 भ्रमणध्वनी बाबत मालकी- ताबा या विषयी त्यास विचारले असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल सांगाडा- इंजीन क्रमांच्या सहायाने तसेच भ्रमणध्वनीच्या आयएमईआय (IMEI) क्रमांच्या आधारे तांत्रीक तपास शोध घेतला. यात 3 मोटारसायकलय या उस्मानाबाद (श.) पो.ठा. गु.र.क्र. 163 / 2021, शिराढोन पो.ठा. गु.र.क्र. 136 / 2021, बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 92 / 2021 या गुन्ह्यांत तर 1 मोटारसायकल ही सोलापूर जिल्ह्यातील सदर बाजार पो.ठा. हद्दीतून चोरीस गेल्याचे समजले. तसेच 4 भ्रमणध्वनी पैकी 3 भ्रमणध्वनी हे ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 116, 193, 225 / 2021 या गुन्ह्यांत तर 1 भ्रमणध्वनी उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 244 / 2021 मध्ये चोरीस गेल्याचे समजले.
यावर पोलीसांनी अविनाश भोसले यास चोरीच्या मोटारासायकल व भ्रमणध्वनीसह ताब्यात घेतले असून त्याच्या उर्वरीत साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
17 वर्षांपासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत
परंडा - : भूम तालुक्यातील वडगाव (नळी) येथील मेघराज उध्दव काळे हे परंडा पो.ठा. गु.र.क्र. 37 / 2008 या गुन्ह्यात पोलीसांना 17 वर्षापासून हवे असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्यांच्या मागावर असतांना ते गावी आल्याची खबर मिळताच परंडा पो.ठा. च्या पथकाने दि. 30 ऑगस्ट रोजी काळे यांना अटक केली आहे.