उस्मानाबादेत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी 24 तासांत ताब्यात

 
s

उस्मानाबाद  : विशाल शिंदे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एच 5085 ही दि. 15- 16 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञाताने चोरुन नेली होती. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 201 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासादरम्यान जुने रेल्वे स्थानक, येडशी येथील रहिवासी- संभाजी शहाजी पवार उर्फ बालाजी, वय 29 वर्षे हा संशयीतरीत्या एक मोटारसायकल बाळगून असल्याची खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली. लागलीच स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोना- टेळे, पोकॉ- ढगारे, मरलापल्ले, ठाकूर, आरसेवाड, माने यांच्या पथकाने दि. 16 ऑगस्ट रोजी संभाजी पवार यास ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत खात्री केली असता ती मो.सा. नमूद गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. यावर चोरीच्या मोटारसायकलसह संभाजी पवार यास ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहिस्तव उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.   (सोबत छायाचित्र जोडले आहे.)

 
दहा आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

दहा गुन्ह्यांत दोषी आढळलेल्या खालील नमूद 10 आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा संबंधीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आज दि. 17 ऑगस्ट रोजी सुनावल्या आहेत.

 गुणवंत अंबादास वाघमारे, रा. केशेगाव यांनी दि. 07 जुलै रोजी सायंकाळी 06.00 वा. गावतील आपल्या किराणादुकानात कोविड- 19 संसर्गास प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने खबरदारी न घेता भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केले होते. याप्रकरणी त्यांना 500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कळंब पो.ठा. हद्दीत जुगार खेळून म.जु.का. कलम- 12 (अ) चे उल्लंघन करणाऱ्या 3 आरोपींना प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

परंडा पो.ठा. हद्दीत कोविड रोग प्रसाराची शक्यता निर्माण करुन भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन करणाऱ्या फैजउद्दीन चौधरी, सचिन भरताडे, गौस मोमीन, जुबेर विजापूरे, बबन जाधव यांना प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा तर सार्वजनिक रस्त्यावर वाहन धोकादायकपने उभे करुन भा.दं.सं.कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या मनोजकुमार होरे यांना 200 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web