जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ असलेला आरोपी फरार

 
जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ असलेला आरोपी फरार

 उस्मानाबाद -  आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 138 / 2021 भा.दं.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, 34 या गुन्ह्यात तोरंबा, ता. तुळजापूर येथील अमोल शहाजी पाटील, वय 29 वर्षे यास अटक करण्यात आले होते. पोलीस कोठडीदरम्यान अमोल याची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यास जिल्हा व शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान दि. 16 मे रोजी 23.45 वा. अमोल याने शौचास जाण्याचे कारण कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दल जवान ब.क्र. 113 भेटेकर यांना सांगीतले. यावर त्यास शौचालयात नेले असता शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून त्याने पलायन केले. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 224 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रात्री संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल 

 तामलवाडी: तामलवाडी पो.ठा. चे पथक दि. 17 मे रोजी 03.00 वा. पो.ठा. हद्दीत रात्रगस्त करत होते. यावेळी सुरतगांव येथील उड्डान पुलाखालील रस्त्याने एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघे तरुण जात असल्याचे दिसल्याने पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी पोलीसांना टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेउन विचारपुस केली असता त्यांची नावे- 1)योगेश धडके, रा. सावरगांव, ता. तुळजापूर 2)दिपक सिंग, रा. मुंबई अशी असल्याचे समजले. त्यांच्या ताब्यातील विनाक्रमांकाच्या मो.सा. च्या नोंदणी व मालकीबाबत ते पोलीसांना समाधानकारक माहिती देउन न शकल्याने त्यांच्या विरुध्द म.पो.का. कलम- 124 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web