उस्मानाबाद जिल्ह्यात विवाहित महिलेवर अत्याचार करून मारहाण 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : एक 30 वर्षी विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) ही दि. 14 ऑगस्ट रोजी 11.15 वा.सु. आपल्या शेतात असतांना शेजारील गावच्या एका पुरुषाने तीला जवळील ऊसाच्या पिकात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला व घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर दि. 18 ऑगस्ट रोजी पुन्हा ती महिला आपल्या शेतात असतांना त्या पुरुषाने तीला लैंगीक संबंधाची मागणी केली असता त्या महिलेने नकार दिल्याने त्या पुरुषाने तीला लाथाबुक्क्यांनी मारहान करुन तीच्या पतीस ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 19 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 506 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  :  एक 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 18- 19 ऑगस्ट रोजीच्या रात्री तीच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणासाठी तीचे अपहरण  केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
दोन ठिकाणी हाणामारी 

वाशी  : जानकापूर, ता. वाशी येथील आश्रुबा युवराज बाराते हे भाऊबंद- गणपत आप्पा बाराते यांच्या शेतातील पायवाटेचा वापर करत असत. यावर चिडून जावून गणपत यांसह बीकुचंद, बिभीषन, राजदीप, बापूराव, कालिंदा, शिलावती अशा सात जणांनी दि. 09 ऑगस्ट रोजी 08.00 वा. शेत शिवारात आश्रुबा यांना आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, विळ्याने, नळीने मारहान केली. अशा मजकुराच्या आश्रुबा यांनी बीड येथे वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंबी  : चिंचपूर  (बु.) आप्पा रोमन यांसह त्यांच्या कुटूंबातील ज्योतीराम, गोरक, सोनाली, कौशल्या यांनी  शेतातील रस्त्याने रहदारी करण्याच्या वादातून दि. 10 ऑगस्ट रोजी 18.00 वा. गावकरी- सतिष क्षिरसागर, रा. यांच्यासह भाऊ- विष्णु, पिता- बळीराम यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सतिष यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web