बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर वाशीत गुन्हा दाखल

 
Osmanabad police

वाशी  : रेवन सिदा ठोंबरे, रा. नागेवाडी, ता. भुम यांनी दि. 28 ऑगस्ट रोजीच्यापुर्वी नागेवाडी गावातील गट क्र. 80 व 81 मधील त्यांच्या शेतात गौण खनिजाचे बोकायदेशीररित्या उत्खनन करुन मोठी- लहान खडी- 100 ब्रास निर्मीत करुन एकुण 5,93,500 ₹ रकमेच्या गौण खनिजाची चोरी केली. यावरुन तलाठी- निळकंठ केदार यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह गौन खनिज कायदा कलम- 4, 5 सह माईन्स ॲन्ड मिनरल ॲक्ट कलम- 21 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीचे तीन गुन्हे दाखल 

मुरुम : येणेगुर, ता. उमरगा येथील दिपक श्रीकांत उटगे यांनी त्यांची 155 पोती तुर गावातीलच त्यांचे मित्र- काशीनाथ बिराजदार यांच्या शेत गट क्र. 188 मधील गुदामात ठेवली होती. त्या गुदामाचे शटर अज्ञाताने दि. 25- 26 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री उचकटून आतील 62 पोती तुर चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिपक उटगे यांनी दि. 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : होळी, ता. लोहारा येथील बालाजी मोरे यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने दि. 27 ऑगस्ट रोजी 11.00 ते 18.00 वा. दरम्यान तोडून घरातील लोखंडी कापाटात असलेले 27 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 56,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मंगल देशमुख, रा. लातुर या दि. 28 ऑगस्ट रोजी 18.30 वा. सु. कळंब येथील छ. शिवाजी महाराज चौकात बसमधून उतरत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्याजवळील स्मार्टफोन व 2,605 ₹ रोख रक्कम असलेली पर्स चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  : एका 17 वर्षीय मुलाने गावातीलच एका 14 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 27 ऑगस्ट रोजी 11.00 वा. सु. तीच्या राहत्या गल्लीतून अज्ञात करणासाठी अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

अंबी : नळी, ता. भुम येथील रामभाउ हराळ हे त्यांची पत्नी व मुलीसह दि. 28 ऑगस्ट रोजी 21.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी ग्रामस्थ- प्रभु विठ्ठल शिंदे यांनी हराळ यांच्या घरात घूसन पुर्वीच्या वादावरुन रामभाउ यांसह त्यांच्या पत्नी व मुलीस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन हराळ यांसह त्यांच्या मुलीच्या हाताला चावा घेतला. अशा मजकुराच्या हराळ यांनी दि. 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web